मांजरी : मतदारसंघात मुख्य व अंतर्गत रस्ते, शिक्षण,आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे .आमदार चेतन तुपे यांनी गेल्या काही वर्षात जातीपाती विरहित सर्वसमावेशक समाजकारण व राजकारण करत, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला.पुढेही मतदासंघांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी “घड्याळ ” या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन मांजरी ग्रामस्थांना राष्ट्रवादी कॉग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले यांनी केले.
महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मांजरी परिसरात पदयात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली.त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना सुरेश आण्णा घुले बोलत होते.
मांजराई देवी मंदिर – मांजरी बुद्रुक गावठाण – वेताळ वस्ती – कुंजीर वस्ती – माळवाडी – बेल्हेकर वस्ती – साई कॉर्नर – चारवाडा – अनाजी वस्ती – गोडबोले वस्ती – झेड कॉर्नर – घुले नगर – घावटे नगर या भागात आज पदयात्रा आणि बाईक रॅली संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप आण्णा घुले, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे गोपाळ आण्णा म्हस्के , माजी सरपंच शिवराज आप्पा घुले,प्रशांत घुले , दिलीप टकले, रवींद्र गोगावले, अजित घुले,निलेश घुले,रोहिणी तुपे ,पुरुषोत्तम धारवडकर, शैलेश म्हस्के ,सुधीर घुले, अमर घुले, अक्षय तारू,शिवाजी मामा खलसे, राजेंद्र गारुडकर, समीर घुले,अमित घुले, सुमित घुले उपस्थित होते.
तसेच प्रमोद कोद्रे, बबन जगताप , अभिजीत टकले, मंगेश मोरे, अनिल तात्या घुले,महादेव दंदी, सागर बत्ताले, बाळासाहेब घुले, भारती तुपे,मयूर खलसे, जितिन कांबळे, अनुप घुले, सुभाष घुले, सचिन घावटे,सुनील घुले ,संदीप भागे, अभिजित डोगरे, प्रदीप पवार,अमित तुपे , बाबा मोरे , समीर तुपे, संजय घुले,अनिल गुंडाळे,समीर घुले ,अमोल मोरे, सागर घुले, विशाल मस्के, राजू चपळे ,महायुती मधील सर्व सहकारी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.