जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी बनवा खास चटपटीत ‘कैरी डाळ’

डाळ कैरी: डाळ कैरी चे महत्त्व असे की, अक्षय तृतीयेला नैवेद्य म्हणून ठेवतात व चैत्र महिन्यात मंगळा गौरीच्या हळदी कुंकवाला प्रसाद म्हणुन वाटतात अशी ही डाळ कैरी तयार करण्याची सोपी पद्धत आज आम्ही सांगणार आहोत… 

साहित्य: 1 वाटी हरबरा डाळ 5-6 तास भिजत घालणे
1 छोटी कैरी साल काढून किसून घेणे
1 इंच आले, 6-7 हिरव्या मिरच्या, 4-5 लसुण पाकळ्या, मीठ व साखर प्रत्येकी अर्धा चमचा

कृती: मिक्सर मध्ये प्रथम हरबरा डाळ जाडसर वाटून घेणे आणि त्यात बाकी सर्व साहित्य घालणे व त्याचे मिश्रण बनवुन बाउल मध्ये काढून घेणे त्यावर मोहरी, जिरे, हिंग, पांढरे तिळ, कढीपत्ता याची कडकडीत फोडणी घालणे बारीक कापलेली कोथिंबीर व खोबरे किसून घालणे आणि मग तुमची कैरीची डाळ तयार. तुम्ही ही मस्त आंबट गोड तिखट डाळ कैरी पोळी बरोबर किंवा जेवताना तोंडी लावुन खाऊ शकता.

– उषा कर्डिले (ओतूर)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.