मुंबई – ड्रामा क्वीन राखी सावंत प्रत्येक सामाजिक मुद्दयावर आपला व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करत असते. तिच्या मताची कोणी दखल घेओ अथवा न घेओ, त्याच्याशी राखीला काहीही घेणे देणे नसते. तिच्या मताचा व्हिडीओ पब्लिकने बघावा, एवढीच तिची अपेक्षा असते.
View this post on Instagram
आता राखी सावंतवर लवकरच बायोपिक येणार आहे. याबाबत तिने एका बॉलीवूड मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तिने बायोपिकबाबत सांगितले की, संगीतकार जावेद अख्तर यांनी काही वर्षांपूर्वी माझी कहाणी ऐकून माझा आयुष्यावर आधारित चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला होता. ते त्यावेळी म्हणाले होते तुमच्या जीवनावर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली पाहिजे.
View this post on Instagram
यानंतर बरेच वर्षानंतर त्यांचा मला इतक्यात फोन आला असून त्यांनी पुन्हा एकदा माझी जीवनपट बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जर माझ्यावर चित्रपट बनणार असेल तर माझी भूमिका आलिया भट्टने करावी अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली .