मकरंद कुलकर्णी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी (वय 66, रा. कर्वेनगर) यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलिसांचे पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा आदेश दिला.

डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीषसह 11 जणांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. तर, तिघांवर गुन्हा दाखल आहे. तर, तिघांना या गुह्यातून वगळण्यात आलेले आहे. परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मकरंद यांना दि.13 ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी “मकरंद तपासास सहकार्य करत नाहीत. त्यांचे नवी पेठ येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे एक खाते आढळून आले आहे.

याबाबत तपास सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांची पोलीस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी,’ अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. चिन्मय इनामदार यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.