गेल्या काही वर्षांतील प्रमुख घटना

पुणे – बांधकाम मजुरांच्या सुरक्षेविषयी व्यावसायिकांची उदासीनता, कामगार कल्याण मंडळाकडून त्यांच्या नोंदणीसाठी केला जाणारा वेळकाढूपणा तसेच महापालिकेकडून मजुरांच्या सुरक्षेविषयी खबरदारी घेण्याबाबतच्या नियमांच्या तपासणीबाबत केले जाणारे दुर्लक्ष यामुळे गेल्या 8 वर्षांत सुमारे 42 हून अधिक बांधकाम मजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जुलै 2012 : पाषाण येथे भिंत कोसळून 3 मजूरांचा मृत्यू
सप्टेंबर 2012 : तळजाई अनधिकृत इमारत कोसळून 12 मजूरांचा मृत्यू
18 डिसेंबर 2012 : वाघोली येथे घुमटाचे बांधकाम कोसळून 12 मजूरांचा मृत्यू
29 जुलै 2016 : बाणेर येथे 13 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 11 मजूरांचा मृत्यू
जून 2013 : दत्तवाडीत भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली 3 महिलांचा मृत्यू
जून 2019 : दत्तवाडीत भिंत अंगावर पडून चरावेचक महिलेचा मृत्यू

Leave A Reply

Your email address will not be published.