बारामती : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोव्हिडनंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे देखील मोठे संकट निर्माण झाले आहे.
बारामतीत आतापर्यंत या आजाराचे जवळपास 20 ते 25 रुग्ण आढळून आलेत आणि यातील दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सिल्वर ज्युबिली चे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली आहे..