Pune Ganeshotsav | लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज पुणेकर सज्ज झाले आहेत. गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ढोल- ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली आहे.
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणपती मुर्तीच्या मागील सजावटीला आग लागली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र कार्यकर्त्यांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी देखील आपल्या जवळील बाटलीतून पाण्याचा मारा केला.
दरम्यान, पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे विर्सजन झाले आहे. पुण्याच्या पतंगा घाटावर आरती करून कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 4.35 मिनिटांनी झाले. तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वर आणि गुरुजी तालीम गणपतीचे देखील विसर्जन झाले आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.