नवी दिल्ली – महिंद्रा अँड महिंद्रा आणि फोर्ड मोटर कंपनी दरम्यान सहकार्य करार होण्याची घोषणा या अगोदर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळामध्ये बदललेल्या आर्थिक आणि जागतिक परिस्थितीमुळे हा सहकार्य करार होणार नसल्याचे या दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे.
फोर्ड कंपनीने म्हटले आहे की, आम्ही भारतात स्वतंत्रपणे काम करित आहोत. तर महिंद्रा कंपनीने म्हटले आहे की फोर्डसोबत नवे उत्पादन विकसित करणार नाही. त्याऐवजी आम्ही आमची वाहने आणि इलेक्ट्रिक कार विकसित करण्यावर भर देणार आहोत.
दरम्यान, दक्षिण कोरियातील सांग यॉंग मोटार कंपनीमधील भागभांडवल काही गुंतवणूकदारांना विकण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असे महिंद्रा कंपनीने म्हटले आहे. सांग यॉंग कंपनीत महिंद्रा कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल आहे. आणि ती कंपनी दिवाळखोरीत गेली आहेत.