नारायणगाव – नारायणगाव (ता. जुन्नर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी आरती संदीप वारुळे व उपाध्यक्षपदी नीलम प्रकाश पाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान, संस्थेच्या 81 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिलांची निवड करण्यात आली.
संस्थेचे माजी अध्यक्ष कैलास डेरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीलेश घोगडे, एकनाथ माळवे यांनी काम पाहिले. ही सोसायटी जुन्नर तालुक्यातील सर्वाधिक कर्ज वाटप करणारी संस्था असून संस्थेचे एकूण कर्ज वाटप 25 कोटी तर वसूल भांडवल 2 कोटी 25 लाख रुपये असल्याचे सचिव गणेश गडेकर यांनी सांगितले.
ही निवड विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, सरपंच योगेश पाटे, संजय वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.