मनीषा गुगळे यांना “महिलारत्न” पुरस्कार

जामखेड : नगर येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने मनीषा गुगळे यांना ” महिलारत्न “पुरस्कार देण्यात आला. जिजाऊ हास्य क्लबच्या संचालीका सौ. मनिषा संजय गुगळे यांना मानाचा समजला जाणारा महिलारत्न देण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण अहमदनगर येथे करण्यात आले. बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला विषयक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांना महिलारत्न पुरस्कार दिला जातो.
बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरन ,पर्यावरण संतुलना साठी मातीचे गणपती, असे उपक्रम त्यांनी राबवल्यामुळे त्याना हा पुरस्कार देण्यात आला.  जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी, प्रमोद गांधी ,सुनील पितळे ,सुनील बोरा, अभय गुंदेचा सीए, प्रवीण छाजेड, महेंद्र बोरा आदींनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.