“1962 : द वॉर इन द हिल्स’मध्ये झळकणार माही गिल

2009मध्ये प्रदर्शित झालेल्या “देव. डी’ चित्रपटात अभय देओल आणि माही गिल यांच्या बिंदास अभिनय चाहत्यांना खूपच आवडला होता. या चित्रपटातील ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित झळकणार आहे. माही गिल आणि अभय देओल हे आगामी सीरीज “1962 ः द वॉर इन द हिल्स’मध्ये काम करणार आहेत. या सीरीजमध्ये माही गिल ही शनुन सिंहची भूमिका साकारत आहे, जी एका जवानाची पत्नी आहे. यात ती अभय देओलसोबत काम करणार आहे. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahie Gill (@mahieg)

महेश मांजरेकर द्वारा दिग्दर्शित या सिरीजमध्ये सुमीत व्यास, आकाश थोसर आदी कलाकारही काम करणार असून त्याची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. हॉट स्टार स्पेशल्स सीरीज “1962 : द वॉर इन द हिल्स’ ही सत्य घटनेवर आधारित आहे. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahie Gill (@mahieg)

यात तीन हजार चीनी सैनिकांविरोधात 125 जवानांनी दाखविलेल्या शौर्याची कथा दाखविण्यात येणार आहे. या सीरीजबाबत माही गिल म्हणाली, “1962 ः द वॉर इन द हिल्स’ माझयासाठी खूपच खास आहे. कारण एकदा मी जवानांसाठी आवेदन केले होते आणि त्यासाठी माझी निवडही करण्यात आली होती. त्यानंतर आता मला एका वॉर सीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मी एका सैनिकाची नव्हे, तर एका गौरवशाली सैनिकाच्या पत्नीची भूमिका साकारत असल्याचे तिने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.