Mahesh Sawant on Sada Saravankar । माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला होता. या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केलाय. याच पराभवावर उद्धव ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना महेश सावंत यांनी,”बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला,” असे महेश सावंत यांनी व्यक्त केले. तर “राज ठाकरेंचे आव्हान आम्ही मानतच नव्हतो”,असा दावाही महेश सावंत यांनी केला.
दोन वर्षांपूर्वी माझ्यावर फायरिंग Mahesh Sawant on Sada Saravankar ।
महेश सावंत यांनी सावंतवाडीत माध्यमांशी बोलत होते. त्याविषयी बोलताना, “मी सदा सरवणकरांच्या मुलाविरुद्ध सुद्धा अपक्ष लढलो होतो. त्यावेळेस सुद्धा पावणे दोनशे मतांनी पडलो होतो. त्यावेळी ते सेनेच्या तिकिटावर होते, मी अपक्ष होतो. परंतु तो हिशोब शिल्लक होता. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, सदा सरवणकर माझे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आल्यानंतर सुद्धा मी लढलो. त्यांनी दोन वर्षांपूर्वी माझ्यावर फायरिंग देखील केली होती. पण आम्ही बाळासाहेबांना वचन दिलं होतं की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही माहीमवर भगवा फडकवणार आहोत.”असेही त्यांनी म्हटले.
गद्दारीचा शाप आम्ही पुसून टाकला Mahesh Sawant on Sada Saravankar ।
पुढे बोलताना सावंत म्हणाले, आम्ही माहीमवर भगवा फडकवण्याची वाट पाहात होतो. माहीममध्ये सिद्धीविनायक आहे, प्रभादेवी माता आहे. सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहेत. गद्दारीचा शाप माहीमवर लागला होता. तो आम्ही शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला. राज ठाकरेंचं आव्हान आम्ही विचारात घेतलं नव्हतं.
माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला होता. या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केलाय. विशेष म्हणजे या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, अमित ठाकरे हे निवडणुकीला उभे राहिल्याने मतदानाचे विभाजन झाले आणि याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला झाला. महेश सावंत 1300 मतांनी निवडून आले. त्यामुळे राज ठाकरेंसह सदा सरवणकरांनाही या निवडणुकीत मोठा फटका बसलाय.
हेही वाचा
मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’ ! २५ वर्षीय मॉडेलचा भीषण अपघातात मृत्यू ; एक जण गंभीर जखमी