मी आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता…

‘सुपर 30’ सिनेमा पाटणातील जगप्रसिद्ध गणिततज्ज्ञ ‘आनंद कुमार’ यांच्या संघर्षावर आधारित हा बायॉपिक सध्या चांगलीच चर्चेत आहे. जगुन जगाव तर असं जगावं इतिहासानेही एखादं पान आपल्यासाठी राखून ठेवाव असं म्हटलं जात पण हे प्रत्यक्षात जगणारी माणस फार कमी असतात. सर्वसामान्यांत राहून असामान्य कार्य करणारे नावाप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद देणारे ‘आनंद कुमार’ एक असं व्यक्तिमत्व की जे आजच्या युवकांचे प्रेरणास्थान आहे. यातच महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आनंद कुमार यांच्यासंदर्भात एक ट्विट केले आहे.


दरम्यान आनंद कुमार यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आनंद कुमार यांनी आपण अनेक बड्या व्यक्तींने देऊ केलेली देणगी नाकारल्याचे म्हटले. यामध्ये कुमार यांनी आनंद महिंद्रांचेही नाव घेतले होते. याच बातमीवर महिंद्र यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘मी देऊ केलेली मदत नाकारल्याने आनंद कुमार यांनी नुकतेच एका लेखामध्ये सांगितले. मी सांगू इच्छितो की आमची खरोखर भेट झाली आहे. या भेटीमध्ये मी त्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी नम्रपणे मदत नाकारली. त्यांनी अनेकांचे आयुष्य बदलले आहे आणि त्यासाठीच मी त्यांचा प्रशंसक राहिलं त्यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे कार्य ‘आनंद कुमार’ यांनी केले.,’ असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.