Big Boss : पुढील काही दिवसांत बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या शोवरून अनेकवेळा वादही घडले आहेत. मात्र लोक देखील तेच शो बघतात ज्यामध्ये काही तरी वेगळी गोष्ट असते किंवा त्यात काही तरी वादग्रस्त असते. यंदाच्या सिजनसाठी कोणकोणत्या स्पर्धकांना संधी मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करत आहेत. मांजरेकर यांना राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी जरा हटके अंदाजात उत्तर दिले आहे.
राजकारणातील कोणती व्यक्ती तुम्हाला बिग बॉसच्या ( Big Boss ) घरात पाहायला आवडेल असे मांजरेकर यांना एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आले. त्यावर त्यांनी बिग बॉसच्या ( Big Boss ) घरात संजय राऊत यांना स्पर्धक म्हणून पहायला आवडेल असे ते म्हणाले. ( Mahesh Manjrekar says he would like to see Sanjay Raut as contestant in Bigg Boss )
संजय राऊत यांनीच का बिग बॉसच्या घरात यावं असं तुम्हाला वाटते, यावरही मांजरेकरांनी भाष्य केले. ते म्हणाले कि, बिग बॉसच्या घरात ( Big Boss ) स्पर्धक बनून येण्यासाठी माणसाकडे वेगळं व्यक्तिमत्व असायला हवं आणि ते संजय राऊत यांच्यात आहे.
मांजरेकर यांनी राऊत यांच्याबरोबरच अमोल मिटकरी, नितेश राणे यांनाही बिग बॉसच्या ( Big Boss ) घरात बघायला आवडेल असेही म्हटले आहे. बिग बॉस ( Big Boss ) मराठी या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक स्पर्धक म्हणून सहभागी होतात. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला हा शो २ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या या शोबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.