महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल; ‘या’ कारणावरून झाला होता राडा

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक ‘महेश मांजेरकर’ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  मांजरेकर यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर भागातील यवत पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तिक्तीने मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे. 

दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर ही महेश मांजरेकर यांनी आपण पोलीस ठाण्यात दाखल होणार नाही असं देखील सांगितलं जात आहे. तक्रारदराने म्हंटलं कि, पुण्याहून टेंभुर्णीकडे जात असातना एका गाडीने माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि पुढे जावून अचानक ब्रेक मारला. 

त्यामुळे पाठीमागून येणारी माझी गाडी मांजरेकर यांच्या गाडीला धडकली. कारला धडक बसल्यामुळे मांजरेकर आणि त्यांचे काही साथीदार गाडीतून उतरले आणि त्यांनी मला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार शुक्रवार,15 जानेवारीला घडला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.