मुंबई – मधु मंतेना यांच्या “रामायण’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 3 डी असणार असल्यानेही त्याबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले आहे. “रामायण’मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा होती.
मात्र आता या सिनेमात दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूची एन्ट्री होणार असल्याचेही समजले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महेश बाबू ‘रामायण’मधील रामाचा लीड रोल करणार असल्याची चर्चा आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. सिनेमासाठी 300 कोटींचे बजेट निश्चित केले गेले आहे. महेश बाबूला सिनेमाची स्क्रीप्ट खूप आवडली आहे.
मात्र त्याने अद्याप रोलसाठी होकार दिलेला नाही. जर महेश बाबूला रामाच्या रोलसाठी निवडले जाणार असेल, तर हृतिक रोशनचे काय ? हृतिकला या सिनेमासाठी निवडले गेले ही गोष्ट खरी आहे. मात्र त्याने रामाच्या भूमिकेसाठी नव्हे, तर व्हिलनच्या म्हणजे रावणाच्या रोलसाठी काम करायची तयारी दाखवली होती.
अद्याप या सिनेमाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. रामायणाच्या विषयावर एकावेळी दोन सिनेमांची निर्मिती सुरू झाली आहे. यातील एक “आदिपुरुष’ आहे, तर दुसरा “रामायण 3 डी’ आहे.