महेश असवले सुवर्ण पदकाचा मानकरी

टाकवे बुद्रुक – चंदिगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये टाकवे बुद्रुक येथील महेश असवले याने 67 किलो वजन गटामध्ये स्नच 117 किलो व क्‍लिन जर्क 141 किलो असे एकूण 258 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

वडगाव मावळ येथील दुबेज्‌ गुरूकुल येथे बिहारीलाल दुबे व आनंद जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. महेश असवले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत असून पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षमध्ये शिकत आहे.

वडगाव मावळमधून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणारा दुसरा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत ऋषिकेश चव्हाण व चिराग वाघवले हेही पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.