माहेर संस्थेला मिळाला १३२ वा जावई

शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेने आजपर्यंत अनाथ, निराधार, विधवा यांचे विवाह सोहळे साजरे केले असून आज माहेर संस्थेमध्ये नुकताच एक विवाह संपन्न झाला असून माहेर संस्थेला त्या माध्यमातून 132वा जावई मिळाला आहे.

वढू बुद्रुक येथे माहेर संस्थेमध्ये आलेल्या अनाथ मुला मुलींचे संगोपन करत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी देखील माहेर संस्था नेहमीच पुढाकार घेत असते, यापूर्वी अनेक विवाह सोहळे माहेर संस्थेत संपन्न झाले असून आज देखील अर्चना व सोमनाथ यांचा विवाह संपन्न झाला आहे, आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्यामध्ये वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, व्यवस्थापक रमेश दुतोंडे, तेजस्विनी पवार, प्रकाश कोठावळे, रमेश चौधरी, आनंद सागर, मिनी एम. जे. यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

आज आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्या प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला या स्वतः लक्ष देऊन होत्या. तर सोहळ्यामध्ये बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील कासार परिवारातील चि. सोमनाथ किशोर कासार यांचा त्यांच्या परिवाराच्या पसंतीने माहेर संस्थेतील मुलगी सून करायची या उद्देशाने आणि माहेर संस्थेमध्ये असलेली अर्चना हिच्यासोबत हा विवाह ठरला आणि आज हिंदू विवाह पद्धतीप्रमाणे साखरपुडा, हळद समारंभ व इतर विधी पार पडत मोठ्या आनंदात व उत्साहात विवाह पार पडला.

यावेळी शासनाचे सर्व नियम पाळून विवाह सोहळा संपन्न झाला, आज विवाहबद्ध झालेला मुलगा सोमनाथ हा सोमेश्वर परिसरात व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. आज आयोजित करण्यात आलेला विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य केले तसेच माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.