#2019LokSabhaPolls : महेंद्र सिंग धोनीने कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क

रांची (झारखंड) – लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने देखील आपल्या कुटुंबासह आज मतदानाचा हक्क बजावला. झारखंडमधील रांचीतील जवाहर विद्या मंदिर येथील मतदान केंद्रात महेंद्रसिंग धोनी याने आपले मत दिले.

लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी हे मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.