महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. परंतु आजही तो क्रिकेट आणि इतर खेळांद्वारे चाहत्यांच्या कायम चर्चेत आहे. भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव ( Kapil Dev ) यांना गोल्फ खेळाची प्रचंड आवड आहे. कपिल देव हे अनेकदा गोल्फ खेळताना पाहायला मिळाले आहेत. मात्र यावेळी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni ) क्रिकेटच्या बॅटऐवजी गोल्फ स्टिक हातात धरलेली चाहत्यांना पाहायला मिळाली.
अलीकडेच कपिल देव यांनी धोनीसोबतचा ( MS Dhoni ) एक फोटो शेअर केला असून, ‘जेव्हा क्रिकेटर गोल्फ खेळतात’, असे त्या फोटोला कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर धोनीचा गोल्फ खेळतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये धोनी गोल्फ खेळण्याचा खूप आनंद घेत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला युजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहेत.
एका यूजरने लिहिले की, ‘हा खेळाडू प्रत्येक गेममध्ये एक्सपर्ट आहे.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘त्याला आता आणखी सरावाची गरज आहे.’ एका यूजरने माही लिहून हार्ट इमोजी शेअर केला आहे. २०२३ मध्ये होणार्या आयपीएल स्पर्धेत एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ( Mahendra Singh Dhoni Playing Golf Users Amazing Reaction on Social Media )
चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सर्व अनुमानांना पूर्णविराम देत टीव्ही टुडे नेटवर्कला सांगितले होते की, महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२३ मध्ये सीएसके ( CSK ) चा कर्णधार असेल. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. परंतु २०२२ चा हंगाम संघासाठी आतापर्यंतचा सर्वात वाईट हंगाम राहिला होता.