पुणे: श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे कोरोनामुळे मंगळवारी दुःखद निधन झाले. ते पुण्यात वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची तब्येत खालावली.
कोरोनाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्रित आणणारी संघटना असलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत महेंद्र पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे ९ वे वंशज होते.
ते पुण्यात राहत होते. महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र करण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्य महासंघ’ स्थापन केला होता. त्याचे ते कार्याध्यक्ष होते. पुण्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्यातच श्रीमंत महेंद्र पेशवे यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचे निधन झाले.