शिरूर : शिरुर विधानसभा निवडणुक अतिशय रंगतदार होणार असून महायुतीची शिरुर येथील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करताच अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त अभी नही तो कभी नही असे म्हणत बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.
वाघोलीचे मा. उपसरपंच शांताराम कटके यांनी मंगळवारी (दि.२८) वसुबारसच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत शिरूर तहसिल कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वाघोली ते शिरुर पर्यंत समर्थक कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी ,कार्यकर्ते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने शिरूर येथे उपस्थित होते.