खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. महायुतीकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भीमराव तापकीर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी प्रभातला विशेष प्रतिक्रिया दिली.
मात्र, यावर्षीची लढत पाहता बालेकिल्ल्यावर कोण झेंडा फडकवणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता मनसेकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघात आतापर्यंत एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळी पावणेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तापकीर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आतापर्यंत 32 उमेदवारानी 72 अर्ज नेले आहेत. दुपारनंतर शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे यानी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.