Mahayuti Seat Sharing । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. त्यातच जागावाटपाच्या चर्चा देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी देखील येत्या दोन दिवसात फायनल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचे म्हटले जात आहे. आता मोजक्याच जागांचा प्रश्न असून लवकरच त्या जागांचेही वाटप होईल, अशी माहिती समोर येत येत आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील ही बैठक पार पडली.
अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री अडीच तास बैठक Mahayuti Seat Sharing ।
महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असल्याची माहिती देण्यात येत आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा हव्यात? Mahayuti Seat Sharing ।
महायुतीचे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाला 288 जागांपैकी कमीत कमी 150 जागा हव्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 87 ते 90 जागा हव्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी 60 जागा हव्या आहेत. असे असताना जागावाटपाची ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तिन्ही पक्षांना बंड शांत करण्याचे आव्हान Mahayuti Seat Sharing ।
महायुतीत एकीकडे जागावाटपावर चर्चा चालू आहे. मात्र महायुतीतील तिन्ही पक्षांपुढे अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण बऱ्याच मतदारसंघांसाठी महायुतीत एकापेक्षा जास्त नेते इच्छुक आहे. या नेत्यांची त्या-त्या मतदारसंघांत तयारीदेखील चालू आहे. त्यामुळे एका पक्षाला जागा सुटल्यास दुसऱ्या पक्षातील नेत बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यास बंड शांत करण्याचे आव्हान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे.
हेही वाचा
“व्याजदर कमी करण्याची योग्य वेळ अजून आली नाही” ; शक्तीकांत दास यांची माहिती