Mahayuti Meeting in Nagpur । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यासाठी नेत्यांच्या बैठका, दौरे, जाहीर सभा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. महायुतीचे नेते देखील पुन्हा राज्यात सत्ता राखण्यासाठी कामाला लागलेत. दरम्यान, रविवारी रात्री उशीरपर्यंत महायुतीच्या नेत्यांची नागपुरात महत्वाची बैठक पार पडली. विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात सखोल चर्चा झाली.
महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची विशेष बैठक नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातून महायुतीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते.
रात्री आठ वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर थोड्या वेळाने एकेक करुन महायुतीचे सर्व नेते रामगिरी बंगल्यावर पोहोचले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विदर्भात महायुतीची रणनीती कशी असावी? जागा वाटपांचा प्राथमिक सूत्र काय असावं? या संदर्भात ही बैठक असल्याची चर्चा आहे.
नागपूर आणि विदर्भातील काही प्रलंबित प्रकल्पांसंदर्भातही चर्चा Mahayuti Meeting in Nagpur ।
दरम्यान प्रशासनिक सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे नागपूर आणि विदर्भातील काही प्रलंबित प्रकल्पांसंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे. आचारसंहिता लागण्याच्यापूर्वी विदर्भातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना आणि योजनांना कशी गती द्यायची या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली असून, अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत होऊन चांगली प्रगती झाल्याची माहिती मिळाली आहे.
विदर्भात भाजप मोठा भाऊ Mahayuti Meeting in Nagpur ।
येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीची रणनीती कशी असावी, जागा वाटपांचा प्राथमिक सूत्र काय असावा या संदर्भात या बैठकीत अत्यंत सखोल चर्चा झाली. विदर्भात महायुतीच्या जागा वाटपाचं अंतिम सूत्र स्पष्ट होऊ शकला नाही. मात्र, विदर्भात भाजप मोठा भाऊ असेल असं भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाला या बैठकीत कळवल्याची माहिती आहे.