विकास आणि सुराज्यासाठी महायुती कटिबद्ध – मुक्‍ता टिळक

पुणे – “पुण्याच्या विकासासाठी भाजप आणि महायुती कटिबद्ध आहे. विकास आणि सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करू,’ अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांनी दिली.

टिळक यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महायुतीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले मंडई येथून कोपरा सभांना सुरुवात झाली. विविध 26 ठिकाणी या सभा घेण्यात आल्या. या वेळी टिळक यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या.

टिळक म्हणाल्या, “महिलांसाठी स्वच्छतागृह, पार्किंग, वाडे पुनर्विकास, वारशाचे जतन, पाणी योजना अशा योजनांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास भरारी कायम ठेवणार आहे. महापौरपदाच्या कारकिर्दीत अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. तशाच विकासाची धडाडी येत्या काळात आमदार म्हणूनही कायम ठेऊ, असे आश्‍वासन मुक्‍ता टिळक यांनी दिले.

प्रचाराचा समारोप रॅलीने
टिळक यांच्या प्रचाराची सांगता कसबा विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी काढून करण्यात येणार आहे. या फेरीत मोठ्या प्रमाणात मतदारसंघातील महिला, युवक कर्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार असून कसबा विधानसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या सभेने टिळक यांच्या प्रचाराची सांगता केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून ही विजयी संकल्प रॅली असणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.