हडपसर : केंद्रात महायुतीचे सरकार आहे .राज्यातही महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आम्हा तिघांवर विशेष लक्ष असणार आहे.त्यामुळे आम्हीं तिघे एकत्र काम करून मागील ४० वर्षात जे घडले नाही. असे काम पाच वर्षात करून दाखवू. महायुतीकडे हडपसरच्या विकासाचे व्हिजन आहे.त्यामुळे जातीपातीच्या राजकारणात न अडकता चेतन तुपे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ माळवाडी रोड येथे विठ्ठल तुपे नाट्यगृह समोर आयोजित विकास संकल्प सभेत ते बोलत होते.यावेळी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे, आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, गोपाळराव म्हस्के, माजी महापौर वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, उज्वला जंगले, माजी नगरसेवक मारुती तुपे, फारुकभाई इनामदार, अशोक कांबळे, उल्हास तुपे उपस्थित होते.
तसेच महादेव दंदी,नंदा लोणकर, सुरेखा कवडे, सुभाष जंगले, संदीप दळवी,भूषण तुपे, संदीप लोणकर, सुनिल बनकर, जीवन जाधव, शिवराज घुले, आण्णा धारवाडकर, नाना म्हस्के, बाळासाहेब कोद्रे,वासंती काकडे, विजया वाडकर, नंदू घुले, नितीन होले, डॉ.शंतनू जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार योगेश टिळेकर म्हणाले की मतदार संघातील विकास हेच सूत्र आमचं ठरलेले आहे. जातीपातीसाठी नाहीतर गोरगरीब जनतेचे काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
महायुतीचे उमेदवार चेतन तुपे म्हणाले ,की विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत. काय करणार ते सांगत नाहीत. याउलट मतदार संघात आमदार योगेश अण्णा ,शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना आणि आम्ही महायुतीचे सर्वच जण हडपसरच्या विकासाचे व्हिजन घेऊन समोर आलो आहोत. बिझनेस हब, क्रीडा संकुल, प्रशासकीय भवन ,भैरोबा नाला ते यवत एक्सप्रेस कॉरिडॉर, मेट्रो, संविधान भवन ,भाषा भवन ,सायन्स पार्क, नीट जेईई व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका व प्रशिक्षण केंद्र,पाणी पुरवठा योजना अश्या अनेक विकास कामांचा आमचा संकल्प आहे. तो विकास आम्ही तिघे मिळून पुढील पाच वर्षात करून दाखवू ,असा विश्वास तुपे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वात राज्यात महायुतीच सरकार आलं आणि अडीच वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र विकासाची दिशा दिली गेली.जे ७० वर्षे या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्णय घेतले नाही ते ऐतिहासिक निर्णय या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या आपल्या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी घेतले आहेत. हडपसर मध्ये विकासाची गंगा योगेश आण्णा आणि चेतन पाटील दोन आमदारांनी आणली आहे.पुढेही ही विकासाची गती अशीच ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना विजयी करावे.
…. अन आमदारांच्या डोळ्यात तरळले अश्रू !
सन २००७ ला मी पहिली घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि आजही घड्याळ चिन्हावर उभा आहे.मी कधीही घड्याळ सोडले नाही.मी आहे तेथेच आहे.मतदार संघात माझी गोरगरीब जनता ही गल्लीबोळात राहत आहे. त्यामुळे मी गल्लीबोळात काम करतो.सर्वसामान्य लोकांत राहून मी जर सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असेल तर माझं नेमकं काय चुकलं .विरोधक काय म्हणतात याची फिकीर नाही.मी गरिबांच्या दारात जावून काम करेल ,असे सांगताना महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
विजयात मुस्लिम समाजाचा सिहांचा वाटा असेल
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार चेतन तुपे यांनी मुस्लिम समाज बांधवांसाठी राज्यात आणि मतदारसंघात मोठे काम केले आहे.मुस्लिम समाज हा सुशिक्षित आहे.तो चेतन तुपेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.त्यामुळे त्यांच्या विजयात इथल्या मुस्लिम समाज बांधवांचा सिहांचा वाटा असेल, असा विश्वास माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांनी व्यक्त केला.