महाबळेश्वर – मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व येथील सुभाष चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या घोषणांनी येथील परिसर दुमदुमला.
यावेळी महायुतीचे विजय नायडू, राजेंद्र पवार, संजय ओंबळे, महेंद्र परदेशी, सचिन गुजर, ओमकार दीक्षित, चिन्मय आगरकर, सुनील ढेबे, मकरंद महाबळेश्वरकर, गजानन फळणे, बंटी शेटे, विनायक साळवी, बबलू काळे, धीरज परमार, रमेश धनावडे, अमेय रानडे, वर्षा आरडे, मेघा चोरगे, उषा ओंबळे, सुनीता फळणे, आशा जाधव, संगीता बन्से, लक्ष्मी वाडकर, अनिता पवार, अपूर्वा डोईफोडे, सोनाली बांदल, पल्लवी डोईफोडे व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.