ZP Election : राज्यातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे १५ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांमधील अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट झालं असून, आता सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे. शिंदेसेनेचे महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडणून आले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेने आपला पहिला बिनविरोध विजय मिळवत रायगडमध्ये जल्लोष केला आहे. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढा भरवत आनंद साजरा केला आहे. मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळला सिंधुदुर्गात भाजपचे 19 तर शिंदेसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, मतदानापूर्वीच या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, निवडणुकांपूर्वीच काहींनी विजयाचा गुलाल उधळला आहे. कोकणात महायुतीने विजयी खाते उघडले असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी आधीच महायुतीचे तब्बल 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. Mahayuti Unopposed Winners ZP Election त्यामध्ये, रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीत सवाने धामणे गणातून अनिल जाधव बिनविरोध आल्याने महायुतीचे एकूण 22 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. जिल्हा परिषदेत बिनविरोध उमेदवार खारेपाटण: प्राची इस्वालकर बांदा: प्रमोद कामत पडेल: सुयोगी घाडी बापर्डे: अवनी तेली कोळपे: प्रमोद रावराणे किंजवडे: सावी लोके तर जाणवली जिल्हा परिषद गटातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रुहिता तांबे या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. पंचायत समितीत भाजप-शिंदे सेनेचे बिनविरोध बिडवाडी: संजना राणे वरवडे: सोनू सावंत कोकीसरे: साधना नकाशे पडेल: अंकुश ठुकरूल नाडण: गणेश राणे बापर्डे: संजना लाड नाटळ: सायली कृपाळ नांदगाव: हर्षदा वाळके शिरगाव: शीतल तावडे फणसगाव: समृद्धी चव्हाण जाणवली: महेश्वरी चव्हाण आडवली:मालडी: सीमा परुळेकर आसोली: संकेत धुरी तर कोलझर पंचायत समितीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हेही वाचा : Top 10 News : महापालिकांतील सत्तावाटपासाठी आज बैठक, अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर Maharashtra Weather Today : थंडी गायब अन् पावसाची एन्ट्री ! ठाणे, रायगडमध्ये पावसाच्या सरी तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण