हडपसर | ही विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रधर्म रक्षणाची आहे. सगळ्यांनी एकजुटीने सज्ज होऊन, आता महाराष्ट्र द्वेष्ट्यांना हद्दपार केलंच पाहिजे. आता महाराष्ट्रासाठी लढायचं, आपल्या स्वाभिमानासाठी लढायचं! हा निर्धार महाविकास आघाडीतील प्रत्येकाने केला आहे. त्यामुळेच आज प्रत्येकजण महाविकास आघाडीच्या विजयासाठी एकवटला आहे. महाविकास आघाडीची ही वज्रमूठ आणि मिळणारा पाठिंबा हा मला विजयश्री नक्की देईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवारी) शेवटचा दिवस होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.त्यावेळी जगताप यांनी विश्वास व्यक्त केला.
विविध समाजघटकांशी संवाद प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सेंट पॅट्रिक टाऊन सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन जगताप यांनी मतदारांना केले.
“हडपसरमधील निष्ठावान शिवसैनिकांची ताकद मला पुढील संघर्षात बळ देणारी आहे. रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी, तसेच पुरोगामी व समतेच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला पाठिंबा ऊर्जादायी आहे. महाविकास आघाडीच्या सर्वसमावेशक, विकसनशील विचारांवर विश्वास ठेवत, समतेच्या विचारांना आंबेडकरी शक्तीची ताकद देत हे सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिल्याने येथे नक्कीच परिवर्तन घडणार, असा मला विश्वास आहे. हडपसरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही एकजूट पुढेही कायम राहील. पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार मानतो.”
प्रशांत जगताप , उमेदवार.
महाविकास आघाडी, हडपसर विधानसभा
हडपसर: मतदारसंघातून अनेकांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.