महाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्‍चर – चंद्रशेखर बावनकुळे

मंचर -महाविकास आघाडी सरकारची तीनचाकी रिक्षा पंक्‍चर झाली आहे. मुख्यमंत्री मुंबई पुरते,अजित पवार बारामती पुरते आणि इतर मंत्री हे आपापल्या मतदारसंघात फिरतात, 

त्यामुळे राज्यातील विविध प्रश्‍नांनी डोके वर काढले असून, त्यामुळे जनता त्रस्त झाली असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

यावेळी भाजपाचे जिल्हा प्रमुख गणेश भेगडे, राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले,

मंचर शहर अध्यक्ष नवनाथ थोरात, सुशांत थोरात, गणेश बाणखेले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले.

डिसेंबर महिन्याच्या आत मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही.तर मंत्र्यांच्या गाड्‌या गावात फिरू देणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.