महाविकास आघाडी म्हणजे गोंधळलेले सरकार – चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर  -भाजप आणि शिवसेना यांना एकत्र येऊन सरकार बनवण्याचा कौल जनतेने दिला होता मात्र शिवसेनेच्या महत्वाकांक्षेपायी ज्यांचे विचार वेगळे आहेत असे तीन पक्ष एकत्र आले. एका वाक्‍यात गोंधळलेले सरकार, संवेदनशीलता नसलेले सरकार, करोनात अपयशी ठरलेले सरकार अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका केली. 

ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणात यांनी काहीही केले नाही, ओबीसींना अस्वस्थ करून ठेवले. समाज समाजात तेढ वाढवण्याचे काम केले. कृषी क्षेत्रात बोंबाबोंब, कुणालाही काहीही मदत नाही, शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ, महिलांवर अत्याचार वाढले. साध्या फेरीवाल्यांना सुद्धा यांनी काही दिले नाही. घरकाम करणाऱ्या नागरिकांना काहीही मदत केली नाही. आर्थिक संकट असल्याचे कायम सांगायचे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.