नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार आता नाही, असे त्यांनी म्हणले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, अर्ज मागे घेण्याची तारीख गेली असली तरीही महाविकास आघाडीने आता निवडणूक आयोगाला सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी पत्र देण्याची गरज आहे. तसेची आता महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार नाही, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना सुद्धा कोविड झाला होता.
तसेच, महाविकास आघाडीकहा जाहीरनामा आमची नक्कल असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांनी जाहीरनामा आमच्या कम्प्युटरमध्ये टाईप केलेला दिसत आहे. त्यांची कॉपी पेस्ट करायची सवय आहे. त्यांचा खोटारडेपणा खुर्चीत येऊन थांबतो. त्यांचे शिक्षक पश्चाताप करत असतील, त्यांना आम्ही चुकीचे शिकवले का? असा प्रश्न त्यांच्या शिक्षकांना पडत असेल. बटेंगे तो कटेंगे हे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हणले आहे. सर्व जाती व धर्मांनी एकत्र राहण्यास आम्ही सांगत आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे प्रेम आहे ते कॉंग्रेससोबत राहुच शकत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.