अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे, अशी घणाघती टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राम शिंदे म्हणाले कि, हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हातवर पोट असणाऱ्या व्यक्तीला कुठलीही मदत राज्य सरकारने केली नाही. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे काम राज्य सरकार करत आहे, अशीही टीका राम शिंदे यांनी केली आहे.