वडगाव मावळ – महाविकासआघाडीचे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहे, त्यामुळे नक्कीच निवडून येतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त वडगाव येथील ओरिटल हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, माऊली दाभाडे, पार्थ पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबन भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बॅंक उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सभापती बाबुराव वायकर, सुभाष जाधव, विठ्ठल शिंदे, गणेश काकडे, गणेश खांडगे, मयूर ढोरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक किशोर भेगडे, जीवन गायकवाड, शिवसेना नेत्या शालान चौधरी, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, सुनील भोंगाडे, विलास मालपोटे, विशाल वहिले, अतुल राऊत व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रजित वाघमारे व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी केले. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी आभार मानले.