महात्मा गांधींनाही काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करायचे होते – पंतप्रधान मोदी 

नवी दिल्ली – इंग्रजांच्या शासनावेळी मिठावर लावण्यात आलेल्या कराविरोधात महात्मा गांधी यांनी केलेल्या दांडी यात्रेला आज ८९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहीत काँग्रेसवर हल्ला चढविला आहे. काँग्रेसने नेहमीच वंशवादी संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याने महात्मा गांधी स्वतः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाला संपत करू इच्छित होते. आमचा पक्ष महात्मा गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हंटले कि, काँग्रेसने समाजाला दोन भागात विभाजित केले आहे. तसेच जाती आणि धर्माच्या नावाखाली राजकारण केले आहे. गरिबांचे पैसे हडप करून काँग्रेस नेत्यांनी आपले खिसे भरले आहेत. काँग्रेस आणि भ्रष्टाचार एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते पुढे म्हणाले, काँग्रेसने राजकारणात घराणेशाहीला जन्म दिला. काँग्रेसने लोकशाहीचा अपमान केला आहे. राज्यांमध्ये संविधानचे कलम ३६५ चा अनेक वेळा गैरवापर केला आहे. काँग्रेसने देशाला आणीबाणी दिली. महात्मा गांधीजी काँग्रेस संस्कृती चांगल्या प्रकारे समजले होते म्हणूनच ते स्वतः काँग्रेसला संपविण्याच्या पक्षात होते. विशेषतः १९४७ सालानंतर, असा दावा मोदींनी ब्लॉगमध्ये केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.