कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये चार टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला.
सदरच्या मोहिमेचा 63 वा रविवार असून या अभियानामध्ये जेष्ट नागरिक, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, राम मराठाचे सुशांत पोवार, आम आदमी अध्यक्ष संदिप देसाई, उपाध्यक्ष उत्तम पाटील, संघटन मंत्री सुरज सर्वे, आदम शेख, महेश घोलपे, विशाल वाठारे, सचिन डाफळे, राज कोरगावकर, सुभाष यादव, बसाप्पा हदिमनी, सविराज पाटील, आनंदराव वनिरे व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
याचबरोबर कसबा बावडा झूम प्रकल्प परिसरात हवा शुध्द ठेवणारी विषारी वायू शोषून घेणारी 15 ते 20 फुटी झाडांचे पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक निखील पाडळकर व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांनी वृक्षारोपन केले. या वृक्षारोपनामध्ये प्रामुख्याने महारुख, तामण, पुत्रंजीवी, सातवीन, कडुलींब, जांभूळ, वड, पिंपळ, हेळा, सोनचाफा, बिट्टी, मोर आवळा, करंज, बेल अशा देशी झाडांचा समावेश होता. यावेळी आरोग्य विभाकडील कर्मचारी यांना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले