खोडद -म्हाळुंगी खिंडजवळील ठाकरवाडी (ता. जुन्नर) येथे महाशिवरात्रीनिमित्त मुंबई जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन बनकर, मुंबई पोलीस दलातील संजय डेरे, गायकर साहेब, मल्हारी लोंढे, संजय वारुळे, मच्छिंद्र वायकर, एअर इंडियाचे अनंथा हांडे, द्राक्ष बागायतदार अरुण घोडेकर यांनी रुद्राक्षाला महारुद्राक्षाभिषेक केला.
भाविकांनी शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करून दर्शन घेतले. सकाळपासून मंदिरांपुढे भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी भाविकांना केळी, खिचडी, राजगिरा चिक्की, खजूर प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.