कोरोना बॉम्बने बारामती हादरली, पूर्णतः लॉकडाऊनचे मिळताहेत संकेत…

रुग्ण संख्येने ओलांडला दहा हजाराचा टप्पा

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात कोरोना चा प्रकोप सुरूच असून काल दिवसभरात 238 जण कोरोणा बाधित असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले. शहरात 155 तर ग्रामीण भागात 83 रुग्ण आढळले. कोरोना च्या वाढत्या परिस्थिती मुळे प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणेवर स्थान निर्माण झाला आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थिती मुळे बारामती शहर व तालुका पूर्णता लॉकडाउन होण्याचे संकेत मिळत आहेत. आत्तापर्यंतच्या रुग्णसंख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

बारामतीत विविध तपासण्यांमधून आढळलेल्या कोरोना ग्रस्तांमध्ये मळद येथील एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये येथील 27 वर्षीय पुरुष, 90 वर्षीय पुरुष, सहा वर्षीय मुलगी, 26 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगा कोरोना बाधित आढळून आले आहेत.

झारगडवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, बांदलवाडी येथील 43 वर्षीय महिला, पणदरे येथील 12 वर्षीय मुलगा, वडगाव निंबाळकर येथील वीस वर्षीय पुरुष, चोपडज येथील 34 वर्षीय पुरुष, सदोबाचिवाडी येथील तीस वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 56 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोर्‍हाळे खुर्द येथील 28 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 16 वर्षीय मुलगी, लिमटेक येथील 41 वर्षीय महिला, कन्हेरी येथील 68 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 20 वर्षीय पुरुष, जळगाव कडेपठार येथील 39 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 22 वर्षीय महिला, मेडद येथील 70 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जळगाव कडेपठार येथील 30 वर्षीय पुरुष, फोंडवाडा येथील 66 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, मेडद येथील 25 वर्षीय पुरुष, जळकेवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, येथील 78 वर्षीय पुरुष, खराडेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, कारखेल येथील 58 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, नारोळी येथील 26 वर्षीय पुरुष, सुपा येथील 47 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तरडोली येथील 61 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, भिकोबानगर येथील 60 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 24 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 57 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

माळेगाव बुद्रुक येथील तीस वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 32 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, पणदरे येथील 12 वर्षीय मुलगा, 50 वर्षीय महिला, निरावागज येथील 18 वर्षीय युवक, 70 वर्षीय पुरुष, शिरवली तुपे वस्ती येथील 40 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 52 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 40 वर्षीय पुरुष, पारवडी येथील 31 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, कटफळ येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.