तैवान: तैवानमधील तैचुंग येथे होणाऱ्या 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताच्या 30 खेळाडूंच्या संघाची घोषणा कुस्ती महासंघाने केली आहे. या संघात महाराष्ट्राची उदयोन्मुख खेळाडू धनश्री हीची निवड झाली आहे. सोनीपत आणि लखनौ येथे झालेल्या चाचण्यांमधून या मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यात मुलींमध्ये महाराष्ट्राच्या धनश्रीचा समावेश करण्यात आला असून या स्पर्धेत प्रथमच दोन्ही संघ एकाच वेळी सहभागी
होत आहेत.
गेल्या वर्षी भारताने फ्रीस्टाइल प्रकारात तिसरे स्थान मिळविले होते. त्यात आठ पदकांची कमाई भारताच्या कुस्तीगिरांनी केली होती. 52 किलो वजनी गटात अमनने एकमेव सुवर्ण जिंकले होते. मुलींनीही तेवढीच प्रभावी कामगिरी करताना सात पदके जिंकली. महिलांच्या संघाने स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला होता.
भारतीय संघ – फ्री स्टाइल – योगेश (38 किलो), अमन (41 किलो), रवी (44 किलो), आकाश (48 किलो), कपिल (52 किलो), उदित (57 किलो), विशाल (62 किलो), सागर (68 किलो), दीपक चहल (75 किलो), जतीन (85 किलो). ग्रीको रोमन – महादेव (38 किलो), दिनेश (41 किलो), हर्ष (44 किलो), हरिकेश (48 किलो), अनिल (52 किलो), सोहित (57 किलो), सुमित (62 किलो), अंकित (68 किलो), चिराग (75 किलो), अर्षदीप (85 किलो). मुली – सलोनी (33 किलो), बबली (36 किलो), कोमल (39 किलो), कोमल (42 किलो), शीतल (46 किलो), धनश्री (50 किलो), आरती (54 किलो), नीतिका (58 किलो), दीपिका (62 किलो), रिया (66 किलो).