मुंबई – इलेक्ट्रिक कार क्षेत्रात कार्यरत असलेली अमेरिकन कंपनी टेस्ला भारतामध्ये उत्पादन सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कंपनीने महाराष्ट्रात उत्पादन सुरू करावे, या संदर्भात महाराष्ट्र सरकार चर्चा करीत आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉलवर चर्चा केली.
या चर्चेत आपणही सहभागी झालो असे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील चाकण येथे बऱ्याच परदेशातील वाहन कंपन्या अनेक वर्षांपासून उत्पादन करीत आहेत. त्यामुळे नव्या वाहन कंपन्यांना या क्षेत्रात काम करण्यास मदत होईल. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढण्याची गरज आहे. यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.