नवी दिल्ली – महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणा-या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरीत करूण गौरविण्यात आले. तसेच केंद्रीय राज्य मंत्री श्री कौशल यांच्याहस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्षसि स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे.
एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या 100 शहरांमध्ये राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगीरी साठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मीशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांची यादी सोबत जोडलेली आहे.
अमृत -स्वच्छ शहर पुरस्कार
1)नवीमुंबई 2) पुणे 3) बृहन्मुंबई 4 ) पनवेल
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायत
1विटा नगरपरिषद10तिवसा नगरपंचायत
2लोणावळा नगरपरिषद11पन्हाळा नगरपरिषद
3सासवड नगरपरिषद12मुरगुड नगरपरिषद
4कराड नगरपरिषद13धानोरा नगरपंचायत
5हिंगोली नगरपरिषद14भद्रावती नगरपरिषद
6देवळाली – प्रवरा नगरपरिषद15मूल नगरपरिषद
7खोपोली नगरपरिषद16दोंडाईचा – वरवाडे नगरपरिषद
8कामठी नगरपरिषद17खानापूर नगरपंचायत
9पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद
नॉनअमृत -स्वच्छ शहर पुरस्कार
ब) कचरामुक्त शहरांचे स्टार मानांकन
अमृत -कचरामुक्त शहरांचे प्रमाणति 3 स्टार मानांकन पुरस्कार
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायत
1लातूर महानगरपालिका7अहमदनगर
महानगरपालिका
2कुळगांव-बदलापुर नगरपरिषद8धुळे
महानगरपालिका
3नवी मुंबईमहानगरपालिका9जळगांव
महानगरपालिका
4पनवेल महानगरपालिका10पुणे
महानगरपालिका
5ठाणे
महानगरपालिका11सातारा नगरपरिषद
6चंद्रपूर
महानगरपालिका
नॉनअमृत -कचरामुक्त शहरांचे प्रमाणित 3 स्टार मानांकन पुरस्कार
अनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायतअनु. क्रनगरपरिषद/ नगरपंचायत
1शेंदूरजनाघाट नगरपरिषद30सेलू नगरपंचायत
2तिवसा नगरपंचायत31उमरेड नगरपरिषद
3घनसांवगी नगरपंचायत32बोधवड नगरपरिषद
4हिंगोली नगरपरिषद33देवळाली – प्रवरा नगरपरिषद
5जाफराबाद नगरपंचायत34एरंडोल नगरपरिषद
6मानवत नगरपरिषद35शिर्डी नगरपंचायत
7नायगाव नगरपंचायत36शिरपूर – वरवाडे नगरपरिषद
8पाथरी नगरपरिषद37सिन्नर नगरपरिषद
9सेलू नगरपरिषद38यावल नगरपरिषद
10सिल्लोड नगरपरिषद39आष्टा नगरपरिषद
11कर्जत नगरपरिषद40गडहिंग्लज नगरपरिषद
12खेड नगरपरिषद41इंदापूर नगरपरिषद
13खोपोली नगरपरिषद42जेजूरी नगरपरिषद
14मुरबाड नगरपंचायत43जुन्नर नगरपरिषद
15शहापूर नगरपंचायत44कराड नगरपरिषद
16बल्लारपूर नगरपरिषद45कुरूंदवाड नगरपरिषद
17भामरागड नगरपंचायत46लोणावळा नगरपरिषद
18ब्रम्हपुरी नगरपरिषद47महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषद
19देसाईगंज नगरपरिषद48मलकापूर नगरपरिषद
20धानोरा नगरपंचायत49मंगळवेढा नगरपरिषद
21कामठी नगरपरिषद50मुरगुड नगरपरिषद
22काटोल नगरपरिषद51पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद
23खापा नगरपरिषद52पन्हाळा नगरपरिषद
24कोरपना नगरपंचायत53रहिमतपूर नगरपरिषद
25महादुला नगरपंचायत54सासवड नगरपरिषद
26मौदा नगरपंचायत55शिरूर नगरपरिषद
27मोवाड नगरपरिषद56वडगांव नगरपरिषद
28नरखेड नगरपरिषद57विटा नगरपरिषद
29सावली नगरपंचायत58वाई नगरपरिषद