महाराष्ट्राचे वैभव! गदिमा, पुल, बाबूजी यांनी आपले जीवन समृद्ध केले- विनोद तावडे

‘बाबूजी’ अर्थात स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ जुलै २०१८ पासून सुरु झाले आहे. १११ मराठी-हिंदी चित्रपटांना संगीत दिलेल्या बाबुजींनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले. मोहनराव भागवत, राम नाईक, पद्मनाभ आचार्य यांच्या उपस्थितीत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बाबुजींच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान तावडे म्हणाले, “गदिमा, पुल, बाबूजी यांनी गीत,साहित्य,संगीताचा सांस्कृतिक वारसा देऊन आपले जीवन समृद्ध केले आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या या तिन्ही प्रतिभावंताची जन्मशताब्दी येत्या वर्षात सुरू होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात साहित्य,गीत,संगीताच्या १०० कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहेत”.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/TawdeVinod/status/1022388614066581505

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)