मुंबई – महाराष्ट्राचा (कोल्हापूर) युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याची भारताच्या 23 वर्षांखालील फुटबॉल संघात निवड झाली आहे. अमिरातीत होणाऱ्या आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी 28 जणांच्या संभाव्य संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या 23 ते 31 ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी अनिकेतला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. याआधी अनिकेतची 17 वर्षांखालील युवा फुटबॉल विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. सध्या तो इंडियन सुपर लीग स्पर्धेत हैदराबाद एफसी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.