#महाराष्ट्रकेसरी : सोलापूरच्या वेताळ शेळकेचे सुवर्णयश

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ८६ किलो गादी विभागात सोलापूर जिल्ह्याच्या वेताळ शेळके याने सुवर्णपदकाची कमाई केली.

म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गादी विभागातील ८६ किलो गटातील अंतिम लढतीत वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाण याचा ८-० ने पराभव केला.

अंतिम लढतीत झालेल्या पराभवामुळं बाबासाहेब चव्हाण याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. याच गटात धुळेच्या हर्षल गवते आणि नाशिक जिल्ह्याच्या रमेश कुकडे यांनी ब्राँझपदक पटकावलं.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.