ZP Election : आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी उद्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याची चर्चा होती, मात्र कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत या याचिकेचा समावेशच करण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्या या प्रकरणावर कोणतीही सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आरक्षणाची मर्यादा ५ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, हा मुद्दा सध्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे. याच कारणामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका रखडल्या आहेत. मात्र, संबंधित याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली गेल्याने निवडणुकांच्या प्रक्रियेबाबतचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा नेमक्या कधी जाहीर होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, या निवडणुकांकडे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले असून, न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. कोणत्या जिल्ह्यांत निवडणूक होणार? या टप्प्यात १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि त्याच्याशी निगडीत 125 पंचायत समिती निवडणुका घेण्यात येणार आहेत: यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपीती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुका होण्याआधीच 11 उमेदवार विजयी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेयत. शिवसेना युबीटी आणि मनसेच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने खारेपाटण जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली पंचायत समितीत ६ उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या पाच, तर पंचायत समितीच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. ZP Election 2026 Reservation Hearing Update जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक कार्यक्रम नामांकन अर्ज भरणे सुरू – 16 जानेवारी 2026 नामांकन पत्रांची छाननी – 22 जानेवारी 2026 उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख – 27 जानेवारी 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत) अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप – 27 जानेवारी 2026 (दुपारी 3:30 नंतर) मतदान – 5 फेब्रुवारी 2026 (सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30) मतमोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 वाजता) हेही वाचा : ZP elections : मोठी बातमी..! जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा बिनविरोध ट्रेंड; ‘हे’ तीन उमेदवार विजयी Pune : जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक: उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म