मुंबई – महाराष्ट्रातील तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी युथ कॉंग्रेस ने एक नविन उपक्रम हाती घेतला असून त्याचा भाग म्हणून त्यांनी आता सर्व तरूणांमध्ये लोकप्रिय असलेल्या टिक-टॉक या ऍपचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्याच्या माध्यमातून एक व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता काही महिने शिल्लक असताना युथ कॉंग्रेसने वेक अप महाराष्ट्र : आज उद्यासाठी असे एक कॅम्पेन सुरू केले आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाच कोटी युवा मतदानांना आकर्षित करण्याचा प्रयत्न युथ कॉंग्रेसचा असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरूणांचे विचार आणि मते जाणून घेऊन त्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा जाहीर नामा ठरविण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र युथ कॉंग्रेसने आयोजित या टिक-टॉक व्हिडिओ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तरूणांना आपला पाच मिनिटांचा व्हिडिओ टिक-टॉक ऍप वापरून तयार करायचा आहे. यात त्यांना आपल्या आयडीया शेअर करायच्या आहेत. यात सहभागी होणाऱ्या तरूणाने आपल्या आयडीया विविध कॅटेगरीसाठी पाठवायच्या आहेत. यात ग्रीन महाराष्ट्र, महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र, टाइमलाइन महाराष्ट्र, ज्ञानी महाराष्ट्र आणि सशक्त महाराष्ट्र यांचा समावेश आहे.