मुंबई – मागील अनेक दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे वादात सापडले आहेत. सुरुवातीला दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने केलेले शारिरीक शोषणाचे आरोप, त्यापाठोपाठ पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता करुणा मुंडे पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.
धनंजय मुंडे यांचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध आहेत. आपण या संदर्भातील सीडी बाहेर काढली तर संपूर्ण महाराष्ट्र हादरेल असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्याविरोधात माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेणार होती. मात्र ती गैरहजर राहिल्याने पत्रकार परिषदेत मी बोलत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या सांगण्यावरूनच मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं. मात्र तरी त्यांनी माझ्या बहिणीला मॅसेज पाठवल्याचा खळबजनक खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळेच आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हकललं पाहिजे. धनंजय मुंडे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असून त्याचे माझ्याकडे पुरावे असल्याचा दावाही करुणा मुंडे यांनी केला.