Wrestling : राष्ट्रीय कुस्तीत महाराष्ट्राला दोन रजतपदके

पुणे – राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची कामिगरी पहिल्या काही सामन्यांनंतर उंचावली असून ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने दोन रजतपदके मिळविली. राष्ट्रीय स्पर्धेत तीनही प्रकारात पदके मिळविण्याची कामगिरी महाराष्ट्राने प्रथमच केली.

करोनामुळे या वेळी भारतीय कुस्ती महासंघाने फ्री-स्टाईल, महिला आणि ग्रीको रोमन अशा तीन प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या घेतल्या. यात महाराष्ट्राने फ्री-स्टाईल प्रकारात 3 रजत, महिला विभागात 1 सुवर्ण, 1 ब्रॉंझ तसेच ग्रीको रोमन प्रकारात दोन रजत अशी एकूण सात पदके मिळविली.

जालंधरमध्ये सुरू असलेल्या ग्रीको रोमन प्रकारात 63 किलो वजन प्रकारात गोविंद यादव रजतपदकाचा मानकरी ठरला. त्याला दिल्लीच्या नीरजकडून गुणांवर पराभव पत्करावा लागला. गोविंद कांदिवलीत सराव करतो. कोल्हापूरचा समीर पाटीलने 72 किलो वजन प्रकारात रजतपदकाचा मान मिळवला. तो सेनादलात सर्व्हिस करत असल्यामुळे तो तिकडेच सराव करतो. राष्ट्रीय पातळीवर या दोघांनी प्रथमच पदकाची कमाई केली आहे.

सविस्तर निकाल –

63 किलो – नीरज (दिल्ली), गोविंद यादव (महाराष्ट्र), एम. तैबंगान्बा (सेनादल), रजीत (सेनादल). 72 किलो – कुलदीप (रेल्वे), समीर पाटिल (महाराष्ट्र), अमित (रेल्वे), विकास (हरियाना). 77 किलो – गुरप्रीत सिंग (पंजाब), महंमद रफिक होली (सेनादल), साजन (रेल्वे), मनजीत (सेनादल). 87 किलो – सुनील कुमार (रेल्वे), प्रभपाल सिंग (पंजाब), अमित (रेल्वे), रविंदर खत्री (सेनादल). 97 किलो – दिपांशू (सेनादल), रवी (रेल्वे), हरदीप (केल्वे), नरेंद्र चीमा (पंजाब).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.