‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र

मुंबई – ‘झिम्मा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि आता या चित्रपटाचे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. “खेळू झिम्मा गं.’ हे या गाण्याचे बोल असून हे गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले

आहे. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपट 19 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्‍वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते,

हे लवकरच प्रेक्षकांना “झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे,

ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्‍य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.